Thought for Today, 29 th June 2020

Life is a trip. The only problem is that it does not come with a map. We have to search our own routes to reach our destination.

Monday, March 09, 2015

Self declaration instead of affadavit and self certified copies of documents for availing Govt. facilities / benefits

शासकीय कार्यालये , स्थानिक स्वराज्यसंस्था इत्यादि   शासकीय संस्थांकडून नागरिकांना  विविध अनुज्ञप्ती, दाखला व  शासकीय सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतात. याकरिता अर्जासह विहित  नमुन्यातील शपथपत्रे सादर करावी लागतात. तसेच मुळ कागदपत्रांच्या राजपत्रित अधिकारी / विशेष कार्यकारी अधिकारी व इतर सक्षम अधिका-यांनी साक्षांकित केलेल्या प्रती सादर कराव्या लागतात. यामुळे नागरिकांना होणारी असुविधा  दूर करण्यासाठी शासकीय कार्यालयामध्ये  शपथपत्र, प्रमाणपत्र तसेच साक्षांकित  प्रती ऐवजी शक्य तेथे स्वघोषणापत्र  तसेच स्वयं-साक्षांकित  प्रती स्विकृत करण्याची  कार्यपद्धती अमलात  आणण्याचा निर्णय  शासनाने  नुकताच घेतला  आहे. यासंबंधित शासन निर्णय कालच  म्हणजे दि. ९ मार्च रोजी निर्गमित केला आहे. सदर निर्णयामध्ये सविस्तर सूचना तसेच स्वयं घोषणा पत्राचा तसेच स्वयं साक्षांकनासाठी स्वयं घोषणा पत्राचा नमुना जोडला आहे.

सामान्य प्रशासन विभागाने निर्गमित केलेला  हा अत्यंत महत्वाचा शासन निर्णय या ब्लॉगवर  " Recently issued Government Resolutions and circulars या शीर्षकाखालील यादीत अनुक्रमांक १६0  वर उपलब्ध आहे. जरूर तर तो  डाउनलोड करून घेता येईल.